khabarbat News Network
बनारस : भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली रेल्वे म्हणून ‘वंदे भारत’ची ओळख निर्माण झाली आहे. यामुळे ही रेल्वे आपआपल्या भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले ‘वंदे भारत’चे इंजिन फेल झाल्याची घटना घडली. त्यानंतर मालगाडीचे इंजिन लावून ‘वंदे भारत’ रेल्वेला नेण्यात आले.
नवी दिल्ली ते बनारस जाणा-या वंदे भारत रेल्वेच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला. इटावामधील भरनथा रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबली. त्यामुळे रेल्वे कर्मचा-यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांना रेल्वेमधील बिघाड दूर करता आला नाही. या रेल्वेमध्ये ७५० प्रवाशी होते. त्यात अनेक राजकीय नेतेही होते. रेल्वेमधील प्रवाशांनी गोंधळ सुरु केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्येस जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये बसवण्यात आले.
Banaras: ‘Vande Bharat’ has become known as the most popular train in India. Due to this, the demand to start this railway from our respective areas is increasing. An incident occurred when the engine of ‘Vande Bharat’, which was made with new technology, failed. After that, the engine of the freight train was started and taken to the ‘Vande Bharat’ railway.
Vande Bharat train from New Delhi to Banaras has broken down in its engine. The train halted at Bharantha railway station in Etawah. This created confusion among the railway employees. Railway technicians reached the spot. But they could not fix the malfunction in the train. There were 750 passengers in this train. Many political leaders were also there. The passengers in the train started rioting. After that, the railway administration stopped Shatabdi Express and Ayodhya-bound Vande Bharat Express and passengers were boarded in those trains.