khabarbat

khabarbat logo

Join Us

conflict between Pakistan and Afghanistan has also started. 8 Afghan Taliban fighters including two top commanders were killed in an encounter between Pakistani security forces and Afghan Taliban fighters

Advertisement

Pakistan attack on Taliban | पाकिस्तानचा तालिबानसोबत पंगा, ८ तालिबानी सैनिक ठार

Rawalpindi : On the one hand, the war that started between Ukraine and Russia is not stopping yet. On the other hand, the war between Israel and Palestine is going on. In this, the conflict between Pakistan and Afghanistan has also started. 8 Afghan Taliban fighters including two top commanders were killed in an encounter between Pakistani security forces and Afghan Taliban fighters in the Khyber Pakhtunkhwa border area. 16 soldiers injured in firing in Khurram border district.

रावळपिंडी : एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेले युद्ध अजून थांबण्याचे नाव घेत नाही. तर दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध सुरु आहे. त्यातच आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील संघर्ष सुरु झाला आहे. खैबर पख्तुनख्वा सीमा भागात पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अफगाणिस्तानच्या तालिबानी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन प्रमुख कमांडरसह ८ अफगाण तालिबानी सैनिक ठार झाले. खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात गोळीबारात १६ सैनिक जखमी झाले आहेत.

अफगाण सैनिक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तालिबान पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमेवरील सैन्यावर खुलेआम हल्ले करत आहेत.

तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प झाला आहे. पाकिस्तानातील कुर्रममधील मरघान येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निमलष्करी दलाचा फ्रंटियर कॉर्प्सचा अधिकारी ठार झाला आणि तीन जण जखमी झाले.

तालिबानचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानी लष्कर हे तालिबानच्या विरोधात कारवाया करुन आगीशी खेळत असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानच्या आठ सैनिकांऐवजी त्यांना सीमेवर ८० सैनिक गमवावे लागतील, असा इशारा तालिबानने दिला आहे. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून सीमा वाद आहे. वेळोवेळी सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये चकमकी घडल्या आहेत, परंतु पाकिस्तानशी झालेल्या चकमकीत तालिबानने एवढ्या मोठ्या संख्येने आपले सैनिक गमाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »