तिरुवअनंतपुरम : मुंबईतील जग प्रसिद्ध डब्बेवाल्या काकांच्या यशाचे आणि व्यवस्थापनाचे धडे आता शालेय अभ्यासक्रमात गिरवले जातील. मुंबईतील डब्बेवाल्यांचा व्यवसाय जवळपास १३० वर्षांहून अधिक जुना आहे. घरचे जेवण थेट कार्यालयात पोहचविण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डब्बेवाले अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली आहे. आता त्यांचा धडा इयत्ता ९वीच्या अभ्यासक्रमात असेल.
The success and management lessons of Mumbai’s world famous Dabbewala Kaka will now be incorporated into the school curriculum. Kerala’s Class 9 English book will have this lesson titled ‘The Saga of the Tiffin Carriers’. Dabbewala’s success story is now included in the updated syllabus for 2024 by the Kerala State Council of Educational Research and Training.
केरळच्या इयत्ता ९ वीतील इंग्रजीच्या पुस्तकात ‘द सागा ऑफ द टिफिन कॅरियर्स’ या नावाने हा पाठ असेल. या धड्याचे लेखक ह्युग आणि कोलीन गँटजर आहेत. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने २०२४ साठी आताच्या अद्ययावत अभ्यासक्रमात डब्बेवाल्याच्या यशोगाथेचा समावेश आहे. या धड्यात डब्बेवाल्यांची सुरुवात कशी झाली. त्यांचे व्यवस्थापन याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील डब्बावाला संघटनेशी जवळपास ५ हजारांहून अधिक जण जोडल्या गेले आहेत. ते जवळपास २ लाखांहून अधिक जणांना डब्बा पोहचवण्याचे काम करतात. महादु हावजी बचे यांनी १८९० मध्ये डब्बे पोहचविण्याची सेवा सुरू केली होती. सुरूवातीला ही सेवा केवळ १०० ग्राहकांपर्यंत मर्यादीत होती.