khabarbat

Advertisement

Flood in North Korea | उत्तर कोरियात महापूर; 30 भ्रष्ट अधिकारी एकाच वेळी फासावर!

North Korea flooded
– 4000 हजार लोकांचा बळी
– 15,000 लोक झाले बेघर

पोंगयांग | उत्तर कोरियाचा हुकुमशहा ऑलिम्पिक वीरांना दिलेल्या शिक्षेवरून चर्चेत असताना आता एकाचवेळी ३० अधिका-यांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियामध्ये महापूर आला होता. या पुराच्या पाण्यात हजारो लोक मारले गेल्याने किम जोंग उन भडकला आहे. यामुळे त्याने या अधिका-यांना थेट फासावरच लटकविण्याचा निर्णय घेतला.

North Korea’s dictator, who was in the news for the punishment given to the Olympic heroes, is now in the news again because of the execution of 30 officials at the same time. There was a flood in North Korea. Kim Jong Un is enraged as thousands of people have been killed in the flood waters. Due to this he decided to hang these officials directly. Heavy rains caused heavy damage in North Korea. 4000 people died in the flood waters.

ज्या अधिका-यांवर भ्रष्टाचाराचे खटले दाखल होते त्यांना किमने फासावर लटकविण्याचा निर्णय घेतला.

North Korea food
North Korea food

भीषण पुरामुळे चागांग प्रांतातील काही भाग उद्ध्वस्त झाला. यामध्ये ४,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हुकूमशहा किमने या पुरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तेव्हा तो अधिका-यांचे नियोजन पाहून भडकला होता. ज्या अधिका-यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले त्यांना जबाबदार धरत तात्काळ फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ऑगस्ट मध्येच या अधिका-यांना एकाच वेळी फाशी देण्यात आली. जुलै महिन्यात चागांग प्रांतात हा पूर आला होता. यात १५,००० हून अधिक लोक बेघर झाले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »