khabarbat News Network
नवी दिल्ली | मुंबईचा १३ टक्के म्हणजे ८३० वर्ग किलोमीटर भाग समुद्रात बुडून जाईल. २१५० पर्यंत मुंबई संपलेली असेल. प्रश्न फक्त समुद्रकिनारी वसलेल्या मुंबईसारख्या शहरांचा नाही. मुद्दा हा आहे की, ज्या समुद्राच्या मदतीने व्यवसाय चालतो. तोच समुद्र गिळून टाकणार. प्राचीन द्वारकेप्रमाणे हे शहर पाण्याखाली असणार. मुंबईला पाहण्यासाठी पारदर्शक सबमरीन किंवा स्कूबा डायविंग करावे लागेल.
13 percent of Mumbai i.e. 830 square kilometers will be submerged in the sea. Mumbai will be over by 2150. The question is not just about coastal cities like Mumbai. The point is, the sea with which the business operates. He will swallow the sea. Like ancient Dwarka, this city will be under water. To see Mumbai one has to go transparent submarine or scuba diving.
समुद्राचा वाढता जलस्तर मोजण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी खास रोबोट्स तयार केले आहेत. हे रोबोट्स पाण्याखाली तैनात केले जात आहेत. नासाच्या जेट प्रोपल्शन लेबोरेटरीने नवीन प्रोजेक्ट सुरु केला आहे. याचे नाव आहे, ‘आईस नोड’. या मिशनमध्ये नासाचे वैज्ञानिक अंटार्क्टिकामध्ये समुद्राच्या आत अंडरवॉटर रोबोट्स सोडत आहेत. हे रोबोट्स समुद्राच्या आतून अभ्यास करतील.
यावर्षी मार्च महिन्यात नासाच्या वैज्ञानिकांनी एक सिलेंडरसारखा रोबोट अलास्काच्या ब्यूफोर्ट समुद्रात १०० फूट खाली तैनात केला. असेच रोबोट्स अंटार्क्टिकात तैनात करण्याची तयारी आहे. हे सर्व रोबोट्स बर्फाचे वितळणे आणि समुद्राचा जलस्तर वाढण्याचा अभ्यास करतील. अंटार्क्टिकात बिघाड झाला, तर सगळ्या जगाला धक्का बसेल. तिथे होणा-या कुठल्याही हवामान बदलाचा जगावर परिणाम होतो. म्हणून तिथे अशी यंत्रे लावण्याची गरज आहे, जे भविष्यातील संकटांची माहिती देतील.