khabarbat

Advertisement

Heat attack | येत्या १० वर्षात बेरोजगारांना हृदयविकाराचा धोका अधिक

 

The unemployed youth have a higher risk of heart disease than the employed. Unemployed people may fall victim to heart related diseases in the next 10 years. A joint medical study by the Indian Council of Medical Research (ICMR) and Delhi ‘AIIMS’ has revealed that men have a higher risk of heart disease than women.

khabarbat News Network

नवी दिल्ली | नोकरी करणा-यांच्या तुलनेत बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बेरोजगार पुढील १० वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात. यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि दिल्ली ‘एम्स’च्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे.

हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी तरुणांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे.

४.५% बेरोजगारांमध्ये धोका गंभीर

या आजारांचे पुढील १० वर्षांत अतिशय कमी, मध्यम आणि उच्च जोखमीचे प्रमाण अनुक्रमे ८४.९, १४.४, ०.७ टक्के असल्याचे आढळून आले. यामध्ये ३४८ बेरोजगारांचा समावेश होता. त्यातील ४.५ टक्के लोकांना पुढील १० वर्षांत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले, तर सुमारे १२ टक्के काम करणा-या लोकांना मध्यम धोका असल्याचे आढळून आले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »