khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

China Astronauts Planting | चिनी अंतराळवीरांनी अंतराळात रुजवली रोपं!

Chinese astronauts have now taken the next step by planting plants in space in Earth’s orbit. China’s National Space Agency has also released a video about this. In this video, Chinese astronauts in the Tiangong space station are seen performing various experiments. Astronauts Commander Ye Guangfu, Li Kang and Li Guangsu are there.

तियांगोंग : वृत्तसंस्था

चीनी अंतराळवीरांनी आता अंतराळात पृथ्वीच्या कक्षेमध्ये रोपं रुजवून आणखी मोठी कमाल केली आहे. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेने याबाबतचा एक व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये तियांगोंग अंतराळ स्थानकामध्ये असलेले चिनी अंतराळवीर विविध प्रयोग करताना दिसत आहेत. कमांडर ये गुआंगफू, ली कांग आणि ली गुआंगसू हे अंतराळवीर तिथे आहेत.

दरम्यान, हे अंतराळवीर निरीक्षणापासून देखभाल दुरुस्ती पर्यंतची कामे पार पाडताना दिसत आहेत. या अंतराळवीरांनी अंतराळ स्टेशनवर एके ठिकाणी काही झाडंही रुजवली आहेत. अंतराळात असलेले हे चिनी अंतराळवीर नोव्हेंबर महिन्यापर्यंत तिथे राहणार आहेत. पृथ्वीवर परतण्यापूर्वी ते अंतराळ स्थानकाचं नियंत्रण शेंन्झोवू १९ च्या अंतराळवीरांकडे सोपवतील.

चीनचे तियांगोंग हे अंतराळ स्थानक हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा मोठे आहे. या अंतराळ स्थानकामध्ये किमान १० वर्षे तरी नियमितपणे अंतराळवीरांना कायम वास्तव्यास ठेवण्याचा चीनचा इरादा आहे. चीनने या अंतराळ स्थानकाच्या बांधणीला २०२१ मध्ये सुरुवात केली होती. तर वर्षभरानंतर २०२२ मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली होती. येथे दर सहा महिन्यांनी नव्या अंतराळवीरांना पाठवले जाते. तियांगोंग अंतराळ स्थानक पृथ्वीपासून ३४० ते ४५० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »