khabarbat

Maharashtra is leading in the suicide cases of students and 14% of the total suicides in the country are taking place in Maharashtra.

Advertisement

student suicide in Maharashtra | विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्राची आघाडी

Maharashtra is leading in the suicide cases of students and 14% of the total suicides in the country are taking place in Maharashtra. According to the NCRB report, it has been revealed that this crisis is continuously increasing. Every year the suicide rate is increasing by 2 percent and the number of students committing suicide is increasing by 4 %.

khabarbat News Network

लातूर | भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा आत्महत्येच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे एका नवीन अहवालातून समोर आले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकूण आत्महत्येच्या १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार हे संकट सतत वाढत असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी आत्महत्येचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढत असून आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ होत आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटावर आधारित वार्षिक आयसी ३ कॉन्फरन्स आणि एक्स्पो २०२४ मध्ये बुधवारी ‘विद्यार्थी आत्महत्या : भारतात वाढणारी महामारी’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आत्महत्यांच्या घटनांमध्ये दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे, तर विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट, चार टक्क्यांनी चिंताजनक वार्षिक दराने वाढले आहे, असे आयसी-३ संस्थेच्या संलग्न अहवालात म्हटले आहे.

गेल्या दशकात, ०-२४ वयोगटातील लोकसंख्या ५८२ कोटींवरून ५८१ कोटींवर घसरली, तर विद्यार्थी आत्महत्येची संख्या ६,६५४ वरून १३ हजारच्याही पुढे गेली आहे.

महाराष्ट्रासाठी गंभीर बाब…
‘आयसी थ्री’ इंस्टीट्यूटच्या विद्यार्थी आत्महत्येसंदर्भातील अहवालामध्ये भारतामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. या राज्यामध्ये आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. देशातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येपैकी १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रातील विद्यार्थी करत आहेत. राजस्थान या बाबतीत दहाव्या क्रमांकावर आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »