khabarbat

khabarbat logo

Join Us

west bengal protest

Advertisement

West Bengal Protest | बंगाल बंद काळात बॉम्बस्फोट; भाजप नेत्यावर तृणमूलचा हल्ला

The rape and murder of a trainee doctor at RG Kar Medical Hospital has created a sensation in Bengal. The police used force on the ‘Nabanna March’ by students to protest against the Mamata Banerjee government. Bengal bandh was called today on behalf of BJP to protest against it. Meanwhile, a local BJP leader was attacked.

कोलकाता I आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘नबन्ना मार्च’वर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज बंगाल बंद पुकारण्यात आला. याच दरम्यान स्थानिक भाजप नेत्यावर हल्ला करण्यात आला.

भाजप नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती स्थानिक भाजपा नेते प्रियांगू पांडे यांच्या कारवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. हल्लेखोराने पांडे यांच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात कारची काच फुटून गोळी चालकाला लागली. या हल्ल्यात प्रियांगू हे देखील जखमी झाले आहेत.

भाजपचे नेते अर्जुन सिंह यांनी या संपूर्ण घटनेचा खुलासा करताना प्रियांगु पांडे आमच्या पक्षाचे नेते असल्याचं सांगितलं. ते गाडीने येत होते. गाडी येताच बॉम्बस्फोट झाला. मात्र वाहन न थांबल्याने गोळ्या झाडण्यात आल्या. एसीपींच्या उपस्थितीत हा प्रकार घडला असेही त्यांनी म्हटले आहे.

मोदी विरूद्ध बंद करा, ममतांचा संताप
भाजपच्या पश्चिम बंगाल बंद आणि विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, हे भाजपचे कटकारस्थान आहे, ते मी यशस्वी होऊ देणार नाही. पोलिसांनी संयमाने कोलकात्याचे रक्षण केले. भाजप तपास यंत्रणांची भीती दाखवून लोकांवर दबाव टाकत आहे. माझ्याविरोधात खोटा प्रचार करत आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. जर बंद करायचा असेल, तर मोदींच्या विरोधात करा. उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थानात गुन्हे घडत आहेत, त्यावर भाजप काहीच का बोलत नाही, असा सवाल ममता बॅनर्जींनी केला.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »