khabarbat News Network
निगडी | सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचे उघड झाले. निगडी येथील शाळेत २०२२ ते २१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. या शिक्षकासह प्राचार्य, ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली.
निवृत्ती काळभोर हा क्रीडा शिक्षक पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला मार देईन, अशी धमकी देत असे. २१ ऑगस्ट रोजी ती स्वच्छतागृहातून बाहेर येत असताना त्याने पुन्हा अश्लील वर्तन केले. घरी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठले.
पुन्हा तसेच ‘प्रताप’ शाळेतीलच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी काळभोर विरोधात २०१८ मध्ये पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अपिलात उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पुन्हा नोकरीत सामावून घेतले. हे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. त्यामुळे काळभोर याच्यासह प्राचार्य, ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.