khabarbat News Network
A bus accident took place in Nepal on Friday. A bus carrying 40 Indian passengers plunged into Marsyangdi river in Tanahun district. This bus from Uttar Pradesh was going to Kathmandu from Pokhara. 14 passengers have died in this terrible accident. The bus, registered at Gorakhpur in Uttar Pradesh, was carrying passengers to Nepal. The passengers traveling in the bus are said to be residents of Maharashtra.
तानाहुन I नेपाळमध्ये शुक्रवारी बस अपघात झाला. ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. उत्तर प्रदेशातील ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. या भीषण दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथली नोंदणीकृत बस येथून प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात उत्तर प्रदेशातील बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राय यांनी म्हटले की, उत्तर प्रदेश एफटी ७६२३ क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल ४० प्रवासी होते आणि त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला.
नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली ४५ पोलीस अधिका-यांच्या पथकासह अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोखराहून काठमांडूसाठी निघाले मात्र या प्रवासात अपघात झाला.