Former Indian cricket team captain and former BCCI president Sourav Ganguly is currently showing signs of getting into a big controversy. A petition has been filed in the Calcutta High Court to ask how Sourav Ganguly took land for 999 years for just one rupee to set up a factory.
khabarbat News Nerwork
कोलकाता I भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली सध्या एका मोठ्या वादात सापडण्याची चिन्हं दिसत आहेत. सौरव गांगुली यांनी कारखाना उभारण्यासाठी केवळ एक रुपयामध्ये ९९९ वर्षांसाठी जमीन कशी काय घेतली, याबाबत विचारणा करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
पश्चिम मिदनापूर येथे सौरव गांगुली यांना कारखान्यासाठी १ रुपयात जमीन देण्यात आल्याच्या विरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करणार आहे. या जनहित याचिकेमधून ममता बॅनर्जी सरकारकडून करण्यात येत असलेल्या जमीन वाटपाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
शेख मसूद नावाच्या व्यक्तीने ही जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर चिटफंड घोटाळ्याची सुनावणी करत असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी होईल, असे कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले आहे.