khabarbat

Vijay Mallya will no longer be able to join as a director of any listed Indian company. SEBI has also banned this.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Vijay Mallya I विजय मल्ल्यावर ‘सेबी’ची कठोर कारवाई

Along with the ban, Sebi also froze Vijay Mallya’s holdings in shares and mutual (MF) funds in India. Apart from this, he will no longer be able to join as a director of any listed Indian company. SEBI has also banned this.

khabarbat News Network

मुंबई I बाजार नियामक संस्था सेबीने देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली. सेबीनं विजय (vijay mallya) मल्ल्यावर चुकीच्या पद्धतीनं व्यवहार केल्यामुळे ३ वर्षांची बंदी घातली. विदेशी संस्था आणि बँकांद्वारे बेकायदेशीरपणे व्यवहार करून कंपन्यांच्या किंमती वाढवल्या आणि त्यातून नफा मिळवल्याचा आरोप सेबीनं केला.

शेअर, म्युच्युअल फंड गोठवले : सेबीनं (sebi) बंदी घालण्याबरोबरच विजय मल्ल्याचा भारतातील शेअर्स आणि म्युच्युअल (MF) फंडातील हिस्सा गोठवला. याशिवाय तो यापुढे कोणत्याही लिस्टेड भारतीय कंपनीचे संचालक म्हणून रुजू होऊ शकणार नाही. सेबीनं यावरही बंदी घातली आहे.

विजय मल्ल्यानं नोंदणीकृत संस्थांमार्फत आपलं नाव आणि ओळख लपवून परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा गैरवापर केल्याचं सेबीच्या चौकशीत आढळलं होतं. जानेवारी २००६ ते डिसेंबर २००८ या कालावधीत मल्ल्यानं फसवणुकीच्या व्यवहारातून ५७ लाख डॉलर्सची कमाई केल्याचे सेबीच्या तपासात दिसून आले.

सेबीच्या नियमांनुसार, एफआयआयद्वारे केवळ भारताबाहेर राहणारेच भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करू शकतात. विजय मल्ल्याने हा नियम मोडला आहे.

९ हजार कोटींची थकबाकी
किंगफिशर (kingfisher) बिअर उत्पादक युनायटेड ब्रेवरीजमध्ये विजय मल्ल्याचा ८.१ टक्के हिस्सा आहे. स्मिरनॉफ व्होडका उत्पादक युनायटेड स्पिरिट्समध्येही त्याचा ०.०१ टक्के हिस्सा आहे. विजय मल्ल्यावर बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये त्याने देश सोडला. तो सध्या (britain) ब्रिटनमध्ये आहे. १८० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी (CBI) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने विजय मल्ल्याविरोधात १ जुलै रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »