In Himachal Pradesh’s Manali, a cloudburst caused heavy damage in the Solang Valley. After a heavy rain in the middle of the night, there was a sudden flood in the Anjani Mahadev Nala at around one o’clock in the morning. Due to this water reached from Dhundi to Palchan and Manali city. Due to the flood, large stones and mud have piled up on the bridge. There are queues of vehicles on both sides of the bridge. Due to this, vehicular traffic on the Manali-Leh highway is blocked.
मनाली : वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये सोलांग व्हॅलीमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. मध्यरात्री मुसळधार पावसानंतर अंजनी महादेव नाल्यात पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक महापूर आला. त्यामुळे धुंडी ते पालचन आणि मनाली शहरापर्यंत पाणी पोहोचलं. पुरामुळे पुलावर मोठमोठे दगड आणि चिखल साचले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मनाली-लेह महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प आहे.
मनालीत ढगफुटीमुळे अंजनी महादेव नदी व आखरी नाल्याला पूर आला. या ढगफुटीमुळे बियास नदीलाही पूर आला. ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे पालचन येथे दोन घरे वाहून गेली. तसेच ढगफुटीमुळे लेह मनाली महामार्गाचेही नुकसान झाले. लेह मनाली हायवेवर बांधलेल्या पुलावर मोठे दगड पडले आहेत. पालचनजवळ रात्री मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग-००३ वर ढगफुटी झाली.
पालचन, रुआड आणि कुलंग गावात पुरामुळे गोंधळ उडाला होता. नदीतून येणा-या भयानक आवाजाने सगळेच घाबरले होते.