khabarbat

Mohammed bin Salman Prince of Saudi Arabia has announced reservation for local citizens in engineering jobs in the private sector. They have now announced 25 percent reservation in jobs for their citizens.

Advertisement

Jobs in Saudi I भारतीयांना सौदीत नोकरी दुर्लभ, भूमिपुत्रांसाठी आरक्षणाची सक्ती!

 

नवी दिल्ली I भारतीय तरूण सौदी अरबमध्ये नोकरीसाठी जात असतात. केरळसारख्या राज्यातील अनेक तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला प्राधान्य देत असतात. परंतू आता सौदीला नोकरीसाठी जाणा-या तरुणांवर मोठा परिणाम होईल असा निर्णय सौदीचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला आहे. त्यामुळे भारतीयांचे धाबे दणाणले. आता भारतीयांना सौदीत सहजासहजी नोकरी मिळणे कठीण होणार आहे.

Mohammed Bin Salman Prince of Saudi Arabia has announced reservation for local citizens in engineering jobs in the private sector. They have now announced 25 percent reservation in jobs for their citizens. This decision has been taken to avoid injustice to the local candidates.

सौदी अरबचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खाजगी क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या नोकरीमध्ये स्थानिक नागरिकांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नागरिकांसाठी नोकरीत आता २५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. स्थानिक भूमिपूत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनुष्यबळ संशोधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या या योजनेच्या अनूसार इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात सौदीच्या नागरिकांची संख्या वाढणार आहे, आणि त्यांना रोजगार मिळणार आहे. सौदी अरबची सरकारी प्रेस एजन्सी सौदी प्रेस एजन्सीने सांगितले की, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात २५ टक्के स्थानिकांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. या धोरणामुळे सौदीतील तरुण आणि तरुणींना नोकरीची संधी मिळेल. ज्या खाजगी कंपनीत पाच किंवा पाच पेक्षाही जास्त कर्मचारी काम करीत असतील त्या प्रत्येक कंपनीला या आरक्षणाची अमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या कंपन्या या नियमांची अमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »