नवी दिल्ली I आयडीबीआय बँकेतील सरकारी हिस्सा विक्री प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव तुहिन कांत पांडे यांनी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरबीआय आयडीबीआय बँकेच्या संभाव्य बिडर्सची तपासणी करीत असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती तुहिन कांत पांडे यांनी दिली. आयडीबीआय बँकेत सध्या केंद्र सरकारचा ४५.४८ टक्के हिस्सा आहे. त्यात एलआयसीचा ४९.२४ टक्के हिस्सा आहे. सरकार आणि एलआयसी दोघांनाही मिळून आयडीबीआय बँकेतील ६०.७ टक्के हिस्सा विकायचा आहे.
To bid for IDBI Bank, bidders must have a net worth of at least Rs 22,500 crore and be profitable in three of the last five years. Kotak Mahindra Bank, CSB Bank and Emirates NBD bid for IDBI Bank. Prem Vats has investment in CSB Bank.
२४ जुलै रोजी आयडीबीआय बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. दुपारच्या सुमारास शेअरचा भाव १०.९० टक्क्यांनी वधारला आणि ९५.७० रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर शेअरमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये ६४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर यंदा ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आयडीबीआय बँकेसाठी बोली लावण्यासाठी बिडर्सकडे किमान २२,५०० कोटी रुपयांची नेटवर्थ असणे तसेच, गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांत नफ्यात असणे आवश्यक आहे. आयडीबीआय बँकेसाठी कोटक महिंद्रा बँक, सीएसबी बँक आणि एमिरेट्स एनबीडी यांनी बोली लावली. प्रेम वत्स यांची सीएसबी बँकेत गुंतवणूक आहे.