khabarbat

Advertisement

Hydrogen Gas | गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे, तर हायड्रोजनवर चालणार!

 

khabarbat News Network

 

नवी दिल्ली | प्रदूषणविरहित व स्वच्छ इंधन म्हणून ओळखले जाणा-या हायड्रोजन वायूचा वाहनांमध्ये जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार एक योजना तयार करत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार आहे.

सध्या देशात मोजकीच हायड्रोजन वितरण केंद्रे कार्यरत आहेत. अशा प्रकारची आणखी केंद्रे उघडण्यासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेतले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये भूपृष्ठ वाहतूक खाते, नवीन व अक्षय ऊर्जा खात्यातील वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार आदींचा समावेश आहे.

या समितीची बैठक ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. हायड्रोजनच्या देशांतर्गत साठ्यामध्ये वाढ करणे, त्यासाठी लागणा-या पायाभूत सुविधा उभारणे आदी गोष्टींसाठी ही समिती शिफारसी करणार आहे. त्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

The central government is preparing a plan to maximize the use of hydrogen gas, known as a pollution-free and clean fuel, in vehicles. A committee has been appointed under the chairmanship of Union Surface Transport Minister Nitin Gadkari and it will submit recommendations to the government in this regard and prepare an action plan.

At present, only a few hydrogen distribution centers are functioning in the (India) country. The private sector will also be involved to open more such centers.

हायड्रोजन इंधन म्हणून वितरित करण्यासाठी देशात खूपच मोजकी केंद्रे आहेत. देशभरात अशा प्रकारची केंद्रे स्थापन करण्यासाठी व ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, याचा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती करणार आहे.

हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या कामात केंद्रातील सात ते आठ खात्यांचा सहभाग असणार आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला हे प्रत्येक खाते शिफारसी करणार आहे. ३५० ते ७०० बारपर्यंतच्या हायड्रोजन साठ्यासाठी योग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल.

हायड्रोजनवर चालणा-या वाहनांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. मात्र हा वायू वितरित करण्याची यंत्रणा देशभरात उभारण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »