– १ हजार पेक्षा जास्त टोल नाके राष्ट्रीय महामार्गांवर

– ८ कोटींपेक्षा जास्त वाहनांवर लावले फास्टॅग
नवी दिल्ली | महामार्गांवर अनेक वाहनचालक जाणूनबुजून वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावत नाहीत. अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
काही जण मुद्दामहून वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग स्टिकर चिकटवत नाहीत. त्यामुळे टोल नाक्यांवर विनाकारण इतर वाहनांना विलंब होतो. त्यामुळे टोल संकलन करणा-या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Double toll if there is no FASTag on the glass!
Many motorists on the highways deliberately do not put FASTAG (fastag) stickers on their vehicles. Double toll will be charged from such drivers. The National Highways Authority of India (NHAI) has issued new guidelines in this regard.
समोरच्या काचेवर फास्टॅग स्टिकर नसेल तर अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसूल करावा, असे त्यात म्हटले आहे. असे फास्टॅग ‘ब्लॅकलिस्ट’देखील केले जाऊ शकतात. फास्टॅग (fastag) नसलेल्या वाहनांचा नोंदणी क्रमांक तसेच टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजदेखील जतन करून ठेवण्यात येणार आहे.