khabarbat

A flash flood situation has arisen in China. In just 24 hours, it rained as much as it rains in a year. As a result, 31 rivers in China are flowing at dangerous levels. A high alert was issued in view of bad weather. The biggest problem is in the cities of Henan province in central China.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Flash Flood in China I चीनमध्ये महापूर; ३१ नद्या ओसंडल्या, धरणे तुडूंब

 

नानयांग I चीनमध्ये अचानक पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. केवळ २४ तासांतच वर्षभरात होतो तेवढा पाऊस झाला. यामुळे चीनमधील ३१ नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे.

नानयांग शहरात दाफेंगयिंगमध्ये एकाच दिवसात ६०६.७ मिमी (२४ इंच) पाऊस नोंदवला गेला. वर्षाचा विचार करता या भागात सरासरी ८०० मिमी एवढा पाऊस पडतो. पावसाने हेनान, शेडोंग आणि अनहुई प्रांतात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.

A flash flood situation has arisen in China. In just 24 hours, it rained as much as it rains in a year. As a result, 31 rivers in China are flowing at dangerous levels. A high alert was issued in view of bad weather. The biggest problem is in the cities of Henan province in central China.A flash flood situation has arisen in China. In just 24 hours, it rained as much as it rains in a year. As a result, 31 rivers in China are flowing at dangerous levels. A high alert was issued in view of bad weather. The biggest problem is in the cities of Henan province in central China.

Dafengying in Nanyang City recorded 606.7 mm (24 in) of rain in a single day. Average annual rainfall in this area is 800 mm. The rain has caused flood-like conditions in Henan, Shandong and Anhui provinces.

चीनमधील ‘सीजीटीएन’च्या वृत्तानुसार, हेनान प्रांतातील नानयांगच्या डेंगझोऊ शहरात पाणी धोकादायक पातळीवर पोहोचले होते. वाढत्या पाणीपातळीमुळे अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बचाव पथकाने घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. हवामान विभागाच्या इशा-यानंतर, बीजिंगसह अनेक शहरांतील ट्रेन बंद केल्या आहेत. वायव्य प्रांतातील गांसूमधील कांग काउंटीनेही पावसाचा रेड अलर्ट जारी केला.

आशिया खंडात पावसाचा सर्वाधिक फटका चीनला बसला. चीनमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले. चीनमधील अनेक धरणे भरली आहेत. एवढेच नाही तर, चीनने सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस डॅमचे दरवाजेही उघडले आहेत. याशिवाय, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातही जबरदस्त पाऊस झाला आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »