khabarbat

Kidney Auto Transplant

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Kidney Auto Transplant : देशात प्रथमच पोटाखालील भागात केली किडनी ट्रान्सप्लांट!

khabarbat News Network
नवी दिल्ली : दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी रेनो व्हॅस्कुलर हायपरटेन्शन नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या सात वर्षांच्या मुलावर यशस्वी ऑटोट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली आहे. तब्बल आठ तास चाललेल्या या कठीण शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी बाळाची खराब झालेली एक किडनी पोटाच्या खालच्या भागात प्रत्यारोपित केली.

देशातील ही पहिली तर जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. २९ जून रोजी शस्त्रक्रियेनंतर मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो पूर्णपणे निरोगी आहे.

The first time, a kidney transplant was done in the lower abdomen!

Doctors at Delhi AIIMS have successfully performed auto transplant surgery on a seven-year-old boy suffering from a rare disease called Reno Vascular Hypertension. In this difficult surgery, which lasted for eight hours, the doctor transplanted one of the baby’s damaged kidneys in the lower abdomen.

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि मुलाचे वजन फक्त २१ किलो होते. धमनीमधील विकार किडनीच्या अगदी जवळ होता ही अडचण होती.

त्यामुळे किडनी सुरक्षितपणे नसांपासून वेगळे करणे हे मोठे आव्हान होते. चुकून मोठी नस कापली तरी २०-३० सेकंदात एक ते दीड लिटर रक्तस्त्राव झाला असता. खराब झालेली रक्तवाहिनी अत्यंत काळजीपूर्वक काढली गेली.

गेल्या तीन वर्षांत तीनदा रक्तस्राव झाल्यानंतर पालकांनी प्रणिलला दोन खासगी रुग्णालयात नेले, तिथे त्यांनी मुलाची किडनी काढण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांकडे उपचाराचे दोन पर्याय होते. पहिली स्टेंट आणि दुसरी शस्त्रक्रिया. स्टेंट लावणे शक्य नसल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला.

एम्सच्या जनरल सर्जरी विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. मंजुनाथ पोळ यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील सात वर्षीय प्रणिल चौधरीच्या उजव्या किडनीच्या धमनीमध्ये धमनी विकार होता, त्यामुळे ही धमनी फुग्यासारखी फुगली होती आणि कधीही फुटू शकली असती. हे मुलासाठी अतिशय घातक होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »