khabarbat News Network
मुंबई : केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब झाले असल्याचा गौप्यस्फोट ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. दिल्ली येथे बांधण्यात येत असलेल्या केदारनाथ मंदिराबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अयोध्येतील श्री (Ramlalla) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्यावरून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मोदी (PM Modi) सरकारवर टीकेची झोड उठविली होती.
केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे, हा मुद्दा का चर्चेत येत नाही? असा सवाल करीत स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, हा मुद्दा का उपस्थित केला जात नाही? तिथल्या घोटाळ्यानंतर केदारनाथ दिल्लीत बांधणार का? आणि मग आणखी एक घोटाळा होईल. गायब झालेल्या या २२८ किलो सोन्याच्या अद्याप तपास सुरू झालेला नाही. त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
228 kg gold missing from Kedarnath!
Swami Avimukteswarananda, Shankaracharya of Jyotirmath, revealed that 228 kg of gold has disappeared from Kedarnath. Will Kedarnath be built in Delhi after the scandal there? And then there will be another scandal. The investigation of this missing 228 kg gold has not started yet. Who is responsible for it? He has asked such a question.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यातील आशिर्वाद कार्यक्रमासाठी मुंबईत आलेले होते. यावेळी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दर्शन-आशिर्वाद घेतले. आज (१५ जुलै) रोजी त्यांनी ‘मातोश्री’ला भेट दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विश्वासघात झाला आहे, ते पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत आम्हाला स्वस्थ वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ‘ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आमच्याकडे जो येईल त्याला आशीर्वाद द्यायचा आमचा नियम आहे. नरेंद्र मोदी हे आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत आणि सदैव त्यांच्या कल्याणासाठी बोलतो. त्यांच्याकडून काही चूक झाली तर आम्ही त्यांनाही सांगतो.