khabarbat News Network
Aurangabad (MH) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (BAMU) विद्यापीठात एका ‘योगी बाबा’ने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले आणि तो त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलल्याचे उघड झाले. त्याचे हे कृत्य समोर येताच त्याला चांगलाच इंगा दाखवण्यात आला.
Dr. At Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), a ‘Yogi Baba’ misbehaved with female students and was revealed to have spoken obscene language to them. As soon as this act of his came to light, he was shown a good inga.
विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचे प्रशिक्षण देणारा हा बाबा विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील भाषेत त्यांचा पाणउतारा करत होता. संतापलेल्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांना आपबिती सांगितली. त्यांनी या ‘योगीबाबा’ला जाब विचारला. तेव्हा तो निर्लज्जपणे बोलला आणि आपण तसेच बोलल्याचे कबूल केले. अखेर वडमारे यांनी त्या बाबाच्या कानशिलात लगावून धडा शिकवला.
विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून या भोंदू बाबाला योगवर्ग घेण्याची परवानगी देणारे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षण किरण शूरकांबळे रडारवर आले आहेत.