khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Latur : देव आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का नाही : मनोज जरांगे

khabarbat News Network

 

लातूर : देव जरी आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की उगाच भांडण वाढवू देऊ नका. मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे. जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे. धनगर समाजाच्या लोकांनी आपल्या नेत्यांना सांगावं. धनगर समाजाच्या नेत्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही मध्ये येऊ नका. माझे मराठा बांधवाना आवाहन आहे की जात मोठी करा. मराठ्यांवर हात उचलू नका. जात गेली तर अस्तित्व संपेल, असं मनोज जरांगे म्हणाले.

Maratha leader Manoj Jarange told in the public meeting at Latur, Even if God comes, the reservation of Dhangar community is not disturbed by the Marathas. I would like to tell the leaders of Dhangar community that they should not let the quarrel escalate.

मनोज जरांगे पाटील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून रॅलीची परवानगी नाकारली. पण काहीही झाले तरी बीडची रॅली निघणार आहे. एवढा जातीवादी पालकमंत्री आम्ही कधी पहिला नाही, असं म्हणत जरांगेंनी मुंडेंवर टीका केली आहे.

आपल्या काही चुका या निवडणुकीत झाल्यात त्या पुन्हा होऊ देऊ नका. तुम्ही लोकसभेला एकगठ्ठा मतदान केलं. पण काही मराठ्यांनी ज्यांना मतदान करायचे नव्हतं. त्याला मतदान केलं. कारण मी संगितले होते की कोणाला द्यायचे हे सांगितले नव्हते. म्हणून 10 हजार मतं दुसऱ्याला पडलं आणि 20 हजार मतदारांनी मतदानच केले नाही, असंही जरांगे म्हणाले

मनोज जरांगे गिरीश महाजन यांना उद्देशून म्हणाले….

“गिरीश महाजन साहेब, तुम्ही कितीही डाव टाका. मी सुद्धा आरक्षणातला बाप आहे आणि जातवान क्षत्रिय मराठा आहे. तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर तुम्ही उड्या काय मारायला लागले, तुमच्या डोक्यात हवा घुसली, मंत्रि‍पदाची मस्ती घुसली. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात नाही, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे. ते शेवटी मराठे आहेत. आम्ही तुमच्या सुद्धा धुऱ्या वर करु शकतो”, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना दिला.

धनंजय मुंडेंवर जातीवादाचा आरोप

मनोज जरांगे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाचा आरोप केला आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांग्यावरुन बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली. तरीही मी सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार. बीडच्या पालकमंत्र्यांना असा जातीवाद शोभत नाही”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »