१३० बळी घेणारा भोले बाबा आहे तरी कोण ?
अनुयायांना खड्डयात कोणी आणि का ढकलले ?
हापशाच्या पाण्यासाठी लोक का होतात जीवावर उदार ?
khabarbat News Network

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात ज्या बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, त्याचे खरे नाव सूरजपाल असे आहे. आपल्या प्रवचनात हा बाबा सांगतो, यापूर्वी मी गुप्तचर विभागात नोकरी करीत होतो नंतर नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या बाबाने नारायण साकार हरि तसेच साकार विश्व हरि उर्फ भोले बाबा हे नाव धारण केले. त्याचा जन्म उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यातील पतियाली तालुक्यातील बहादुर या गावात झाला. असे म्हटले जाते की, २६ वर्षापासून या बाबाने नोकरी सोडून धार्मिक प्रवचनाचा मार्ग पत्करला.
भोले बाबाचे पश्चिम उत्तर प्रदेश प्रमाणेच उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत. प्रवचनाच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर सूरजपालने स्वत:चे नामकरण साकार विश्व हरि असे करवून घेतले. त्यांचे अनुयायी भोले बाबा या नावाने ओळखतात.
पारंपारिक धार्मिक प्रवचनकारांच्या तुलनेत आगळी वेशभूषा करून अर्थात थ्री-पीस सूटमध्ये तो प्रवचन देतो. सत्संगाच्या वेळी त्याची पत्नीही शेजारच्या आसनावर उपस्थित असते.
या भोले बाबाची राजकारणावर मजबूत पकड आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील या बाबाच्या सत्संगात हजेरी लावली होती.
Mismanagement plays a major role in stampede incidents. On Tuesday (2nd June) after the satsang ended around 12.30 pm, the crowd of followers was stopped and Bhole Baba was being taken out through the back door. As a result, population pressure increased in the interior. A big pit was dug right here. When the stampede began, some people fell into the pit, and a stampede ensued.
भोले बाबाच्या सत्संगात जो कोणी अनुयायी जातो, त्याला तेथे प्रसाद म्हणून पाणी दिले जाते. बाबाचे अनुयायी असे मानतात की, हे पाणी प्यायल्याने त्यांच्या सा-या समस्या चुटकीसरशी दूर होतात. या बाबाच्या बहादुर नगर या गावामधील आश्रमाच्या बाहेर एक हापसा (हॅँडपंप) आहे. या हापशाचे पाणी पिण्यासाठी दरबारात आलेल्या अनुयायांची भली मोठी रांग लागलेली असते.
दरम्यान, या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमागे चुकीच्या व्यवस्थापनाचा मोठा वाटा आहे. मंगळवारी (दि. २ जून) दुपारी १२.३० च्या सुमारास सत्संग संपल्यानंतर अनुयायांची गर्दी रोखली गेली आणि भोले बाबाला मागच्या दाराने बाहेर काढण्यात येत होते. परिणामी आतील भागात लोकांचा दबाव वाढला. नेमका येथेच एक भला मोठा खड्डा खणलेला होता. रेटारेटी सुरू झाली तेव्हा काही लोक या खड्डयात पडले, आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. खड्डयात पडून काही लोक मृत्युमुखी पडले तसेच अनेक अनुयायी इतरांना पायाखाली तुडवत पुढे जात होते. त्यामुळे गुदमरून अनेक जण दगावले.