khabarbat News Network
नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्व चषकावर नाव कोरले. या विजयासह गेल्या ११ वर्षांपासूनचा आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ रोहितसेनेने संपवला. T-20 क्रिकेट वर्ल्ड कप टीम इंडियाने दुस-यांदा जिंकला आहे. १३० कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणा-या टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने आपला पेटारा उघडला. विश्व विजेत्या संघासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी १२५ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

Team India won the T20 World Cup by defeating South Africa in the final of the T20 World Cup. BCCI Secretary Jai Shah has announced a prize of 125 crores for the world winning team.
सामन्याचा ओझरता आढावा : भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. २० षटकामध्ये सात गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. यामध्ये भारतीय संघाकडून विराट कोहली याने ७६ धावांची जिगरबाज खेळी केली. त्यासोबतच अक्षर पटेल यानेही महत्त्वाची ४७ धावांची खेळी करत सामन्यामध्ये टीम इंडियाचा दबाव कायम ठेवला.
भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला २० षटकामध्ये ८ गडी गमावून अवघ्या १६९ धावा करता आल्या. भारतीय संघाने सात धावांनी विजय मिळवला, आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये भारतीय संघातील गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. हार्दिक पंड्या ३ तर बुमराह आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. सामन्यानंतर विराट कोहली याला सामनावीर तर जसप्रीत बुमराहला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले.