khabarbat

Based on the information received by the police from the investigation of the accused in the NEET paper leak case, 8 of the total 14 admit cards are from another states.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

NEET Scam : तपासाचा फोकस आता लातूर ऐवजी बीडवर केंद्रित

khabarbat News Network

बीड : नीट पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत असल्याचे म्हटले जात होते. पण पोलिसांच्या तपासाचे केंद्र आता लातूर ऐवजी बीडमध्ये स्थिरावले आहे. आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ८ प्रवेशपत्र बिहारमधील आहेत. त्यात १ लातूरचा तर ७ बीडचे विद्यार्थी आहेत. सापडलेल्या प्रवेशपत्रांपैकी सर्वाधिक संख्या ही बीडच्या विद्यार्थ्यांची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचे लक्ष आता बीडकडे वळाले आहे.

Based on the information received by the police from the investigation of the accused in the NEET paper leak case, 8 of the total 14 admit cards are from another states. Out of them 7 admit cards belong to students from Beed district, while 1 admit card belongs to students from Latur district. It is for this reason that the focus of Latur police’s investigation has now shifted to Beed district.

नीट पेपरफुटीचा तपास आता सीबीआयकडे वर्ग झालेला आहे. सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लातूर पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. संजय जाधव आणि जलीलखॉँ पठाण यांना पोलिसांनी अटक केली. इतर दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बीडचे नेमके कनेक्शन काय?
NEET पेपरफुटीच्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण १४ पैकी ८ प्रवेशपत्र हे परराज्यातील आहेत. त्यापैकी ७ प्रवेशपत्र हे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आहेत, तर १ प्रवेशपत्र हे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे आहेत. याच कारणामुळे लातूर पोलिसांच्या तपासाचा फोकस आता बीड जिल्ह्याकडे वळला आहे. पोलिसांनी तेथील पालकांची चौकशी केली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »