केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ (kedarnath) मध्ये रविवारी पहाटे पुन्हा एकदा हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बर्फाळ डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फाचा लोंढा घरंगळत खाली आला. सुदैवाने या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु हिमस्खलनाचे दृश्य पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला.
केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी सकाळी अचानक (Avalanche) हिमस्खलन झाले. पहाटे ५ वाजेच्या सुमारास गांधी सरोवरच्या वरच्या भागातील डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला. सुदैवाने हा बर्फ मंदिरापर्यंत पोहोचला नाही. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, या टेकड्यांवर अनेकदा हिमस्खलन होत असते. पण, रविवारी झालेले हिमस्खलन फार मोठे नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
२०१३ मध्ये आला भीषण पूर
१६ जून २०१३ रोजी केदारनाथ (kedarnath) मध्ये भीषण ढगफुटीमुळे महापूर आला होता. या पुरात तेथील सर्व काही उद्धवस्त झाले होते. तसेच, त्या घटनेत सुमारे ६,००० लोकांचा जीव गेला होता. आता आजच्या हिमस्खलनामुळे नागरिकांना नक्कीच २०१३ ची घटना आठवली असेल.