khabarbat News Network

राजकोट : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ नंतर गुजरातमधील राजकोट विमानतळाचे छत शनिवारी (दि. २९ जून) कोसळले. राजकोटच्या हिरासरमध्ये बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा मोठा भाग पावसात कोसळला.
Part of the roof collapsed in the passenger pick-up and drop area outside the Rajkot airport terminal due to heavy rains.
मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छताचा भाग कोसळला. राजकोट विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन जुलै २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते. १४० कोटींहून अधिक खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला आहे.
तीन दिवसात तिसरी घटना
शुक्रवारीच दिल्ली विमानतळाचे छत कोसळले होते. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक लोक जखमी झाले होते. शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे देशांतर्गत उड्डाणांसाठी पार्किंग परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यादरम्यान अचानक विमानतळाच्या टर्मिनल-१ मधील छताचा मोठा भाग खाली पडला. दुस-या घटनेत मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये गुरुवारी नव्याने बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळाच्या ड्रॉप अँड गो एरियामध्ये छत फुटल्याने पाण्याचा पूर आला होता. या पुरात एक कार चक्काचूर झाली.