khabarbat News Network

हावेरी : कर्नाटकात यात्रेकरूंच्या बसचा मोठा अपघात झाला आहे. हावेरी जिल्ह्यात ही मोठी दुर्घटना घडली. येथील ब्याडगी तालुक्यात शुक्रवारी पहाटे मिनी बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात १३ भाविक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
It is being reported that 13 devotees were killed and two seriously injured in an accident in Byadgi taluka where a mini bus collided with a truck on Friday morning.
All of them were returning from a pilgrimage. Police said the victim is a resident of Shivamogga. This big accident happened while he was returning from Saundatti in Belgaum district after visiting Yallamma Devi.
हे सर्वजण तीर्थयात्रा करून परतत होते. पोलिसांनी सांगितले की, पीडित शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत. ते बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथून यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना ही मोठी दुर्घटना घडली.
दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बस चालकाला झोप लागली होती, त्यामुळे हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.