khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Sunita Williams stranded : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली!

Khabarbat News Network

 

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता (Sunita Williams) विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सुनीता आणि सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते ५ जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि १३ जूनला परतणार होते.

Indian-origin astronaut Sunita Williams is stranded in space. For the past 14 days, Sunita and colleague Butch Wilmore have been stuck in space.

गेल्या १५ दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनिअर दुरुस्त करु शकले नाहीत. अंतराळयान स्टारलाइनरमधील हेलियम लीक होत असल्यामुळे ते परतण्याची शक्यता देखील कमी दिसते.

बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाडानंतर त्यांचे परत येणे चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले. आता नवीन तारीख दिली नाही. बोइंगचा स्टारलाइनर २५ तासांच्या उड्डाणानंतर अभियंत्यांना स्पेसशिपमधील थ्रस्टर सिस्टममध्ये पाच ठिकाणी हेलियम लीक होत असल्याचे समजले. त्यानंतर अंतराळयान परत आणण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला.

परंतु या दोघांनाही कोणताही धोका नसल्याचे नासाने म्हटले आहे. अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी इंजिनिअर काम करत आहेत. अंतराळयानाची क्षमता ४५ दिवसांची आहे. त्यातील १६ दिवस झाले. आता केवळ २५ दिवस राहिले आहेत. नासाचे हे दुसरे अंतराळ यान आहे. हे पहिल्यांदाच अंतराळात गेले आहे. नासासोबत बोइंगने ४.५ अब्ज डॉलरचा करार केला आहे. त्यातील १.५ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.

Most Admired E-PAPER khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »