Khabarbat News Network
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती नागपूर ऐवजी आता सिंदखेड राजा येथेच राहणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक अरुण मलिक यांनी दिली.

The magnificent recumbent Lord Vishnu statue at Sindkhed Raja probably dates to the eleventh or twelfth century.
भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे. मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली. ही मूर्ती साधारणत: अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याची शक्यता आहे.