khabarbat

Kenya withdraws new tax bill after violent protests and violence. Kenyan President William Ruto announced the withdrawal of the bill from State House.

Advertisement

Kenyan Parliament set Ablaze : केनियाची संसद पेटविली; अखेर कर विधेयक मागे!

 

khabarbat News Network

नैरोबी : केनियाने उग्र निदर्शने आणि हिंसाचारानंतर नवीन कर विधेयक मागे घेतले. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी स्टेट हाऊसमधून हे विधेयक मागे घेण्याची घोषणा केली. नवीन कर विधेयकाविरोधात मंगळवारी केनियामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी संसदेबाहेरील बॅरिकेड्स ओलांडून आत प्रवेश केला, खासदार विधेयकावर चर्चा करत असताना विरोधकांनी संसद पेटविली.

Kenya withdraws new tax bill after violent protests and violence. Kenyan President William Ruto announced the withdrawal of the bill from State House.

खासदारांना बोगद्यातून काढले
या काळात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, या निदर्शनात बहुतांश तरुणांनी भाग घेतला होता. संसदेत हिंसाचार बळावला असताना खासदारांना भूमिगत बोगद्यातून बाहेर काढण्यात आले.

सावधगिरीचा इशारा
केनियातील भारतीय दूतावासानेही नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतीयांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि हिंसाचाराच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्याची सूचना देण्यात आली.

केनियाची राजधानी नैरोबीमध्ये आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला. केनियातील सामाजिक कार्यकर्त्या आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची सावत्र बहीण औमा ओबामा यांनीही या निदर्शनांमध्ये भाग घेतला.

Most Admired E-paper khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »