khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Gold City : बांसवाड्यात सोन्याची खाण, बाडमेर बनणार गोल्ड सिटी

 

khabarbat News Network

 

बांसवाडा : राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली. महत्वाचे म्हणजे, ही खाण नजीकच्या भविष्यात देशाच्या २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. अर्थात आता राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाईल.

सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा याचे वाटप करण्यात आले. सोन्याच्या दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला परवाना मिळाला आहे. इतर ब्लॉक कांकरिया गारा गोल्डच्या कंपोझिट परवान्यासाठी ५ कंपन्या स्पर्धेमध्ये आहेत. त्यात मुंबईची पोद्दार डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबादची हीराकुंड नेच्युरल रिसोर्सेस लिमिटेड, रतलामची ओवेस मेटल अँड मिनरल्स प्रोसेसिंग लिमिटेड, उदयपूरची हिंदुस्तान झिंक आणि कानपूरच्या जेके सीमेंट लिमिटेडचा समावेश आहे.

या सोन्याच्या खाणीतून इतरही अनेक खनिजे काढले जातील. यामुळे या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या भागात ९४०.२६ हेक्टरमध्ये ११३.२ मिलियन टन सुवर्ण भांडार सुरुवातीच्या टप्प्यात सापडू शकतो. यात जवळफास २२२.३९ टन सुवर्ण धातू असण्याची शक्यता आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »