New Delhi : khabarbat News Network
आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अर्थात ‘एआय’ चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेचा गृहपाठ असो की हेल्थ रिपोर्ट असोत. एआय टूल्सची सर्वत्र मदत होत आहे. अॅप्सच्या माध्यमातून अवघड परीक्षेचे पेपर सॉल्व्ह करुन त्यातून अभ्यासात भर टाकली जात आहे.
मागच्या वर्षी चॅट जीपीटी यूपीएससी परीक्षेत नापास झालं होतं. त्यामुळे अनेकजण खूश झाले होते की, एआय अजून इतकं सक्षम नाही, ते अवघड परीक्षा पास होऊ शकत नाही. परंतु आता AI App PadhAI ने जगाच्या अवघड परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससी प्रीलिम्स पास केली.
नुकत्याच २०२४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत AI App PadhAI या अॅपने २०० पैकी १७० गुण मिळवले. एवढंच नाही तर सात मिनिटांत पेपर सोडवला. एआयने केलेल्या या जादुई कामगिरीमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
हे अॅप गुगल अॅपवर उपलब्ध आहे. आयआयटीयन्सच्या टीमने हे अॅप तयार केले आहे. रविवारी युपीएससी प्रिलिम्स परीक्षा २०२४ संपल्यानंतर, PadhAI ने दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये सार्वजनिकपणे हजेरी लावली होती. विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेला युपीएससी समुदाय, शिक्षण क्षेत्र आणि मीडियाशी संबंधित लोक उपस्थित होते.