khabarbat

Gautam Gambhir

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

BCCI : गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार; संघ, सपोर्ट स्टाफमध्ये होणार बदल

Khabarbat News Network
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे नाव टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून निश्चित झाले आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप  (World Cup T-20) स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. गौतम गंभीरची नियुक्ती येत्या काही दिवसांत ‘बीसीसीआय’कडून अधिकृतपणे केली जाईल.

गौतम गंभीरच्या बहुतेक सा-या मागण्या ‘बीसीसीआय’ने मान्य केल्या आहेत. अहवालात असेही समोर आले आहे की, गौतम गंभीर (Gautam Gambhir)  केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नाही तर संघातही बदल करणार आहे.

Former Indian opener Gautam Gambhir has been named as the new head coach of Team India. Rahul Dravid’s tenure as the head coach will end after the ongoing Twenty-20 World Cup (World Cup T-20). Gautam Gambhir’s appointment will be officially made by the BCCI at the end of June 2024.

दरम्यान, राहुल द्रविडने या पदावर कायम राहण्याची रोहित शर्माची विनंती अमान्य केली आणि त्यामुळेच BCCI ने नव्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहीरात काढली. अनेक नावे या पदासाठी चर्चेत आली होती, परंतु गौतम गंभीर त्यात आघाडीवर राहिला.

कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम करणा-या गौतमने आयपीएल २०२४ मध्ये फ्रँचायझीला १० वर्षानंतर जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी त्याची दावेदारी प्रबळ झाली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »