khabarbat

NEET battle fought by Alakh Pandey.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

NEET Row : ‘नीट’च्या वादंगातील ‘अलख’

 

khabarbat News Network

सध्या देशात ‘नीट’ परीक्षेवरुन वादंग सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली. ही लढाई अलख पांडे यांनी लढली. त्यांची फिजिक्सवाला ही एडटेक कंपनी संपूर्ण देशात नावाजलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती २ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

२०१४ साली अलाहाबादच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील अलख पांडे हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. त्यांनी अचानक शिक्षणाला रामराम ठोकला. त्यानंतर प्रयागराज येथे कोच्ािंग क्लास चालवला.

Currently there is a debate going on in the country over the ‘NEET’ exam. After the case went to the Supreme Court, the central government clarified its position. Alakh Pandey fought this battle. His edtech company Physicswala is known across the country. His total wealth is around 2 thousand crore rupees.

२०१५ मध्ये अलख पांडे यांनी युट्यूब चॅनल सुरु केले. त्याचे नाव फिजिक्सवाला अलख असे ठेवले. त्याच नावाने एक फेसबुक पेज पण सुरु केले. २०१७ मध्ये मात्र फरक दिसला. देशात स्वस्त 4जी इंटरनेट सेवा सुरु झाली. त्याचसोबत अलख यांनी रणनीती बदलली. त्याचा फायदा दिसला. २०१८ मध्ये युट्यूबने त्यांना पहिला ८ हजारांचा धनादेश पाठवला. त्यावेळी त्यांच्या चॅनलचे जवळपास ५० हजार सब्सक्राईबर होते. त्यांनी कोचिंगची नोकरी सोडण्याचा निश्चय केला.

फिजिक्सवाला ही एक त्यांची युनिकॉर्न कंपनी झाली. कोरोना काळात २०२० मध्ये अलख युट्यूबवर मोफत क्लास घेत होते. त्यांच्या कमाईचे एकमेव साधन युट्यूबच होते. मार्च २०२० मध्ये कोरोनाने एडटेकसाठी नवीन संधीचा दरवाजा उघडला. त्यांच्या कंपनीची उलाढाल पाहता पाहता ९,००० कोटी रुपयांच्या घरात पोहचली; तर त्यांची कमाई २,००० कोटींच्या घरात गेली.

Most Admired e-paper I khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »