khabarbat

Advertisement

Manoj Jarange : गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव; जरांगे यांची प्रकृती खालावली

 

 

संभाजीनगर : खबरबात न्यूज नेटवर्क

‘सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असून मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना चार चार दिवस लावले नसते’, असा आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहेत. दरम्यान आज, मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. मात्र, आपण कोणतेही उपचार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. आज माध्यम प्रतिनिधींसोबत जरांगे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दात इशारा देत प्रकृती खालावली तरीही उपोषण सुरूच राहील असे जाहीर केले.

मनोज जरांगे म्हणाले, अद्याप कोणाशीच संपर्क झालेला नाही. सरकार बैठका घेऊन निर्णय काढू असे सांगून मराठ्यांना लाडीगोडी लावत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव नव्हता असे वक्तव्य केले होते, यावर जरांगे यांनी, छगन भुजबळ यांनी आम्हाला सांगू नये, तू थोड थांब कळेल तुला, असा इशारा दिला. सरकारने दखल घेतली नाही तर मराठे त्यांना नंतर हिसका दाखवतील, असा इशारा देखील जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला दिला आहे.

आरोग्य पथकाने जरांगे पाटील यांची तपासणी केली. या तपासणीत जरांगे पाटील यांचा बीपी कमी झाल्याचे समोर आले. या सोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिली.

दरम्यान जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, अन्यथा त्यांची प्रकृती आणखी खालावेल असे डॉक्टर जयश्री भुसारी यांनी सांगितले. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिली.

भाजप नेते शुक्रवारी भेटणार

मनोज जरांगेशी संवाद साधण्यात येईल. त्यांना फॅक्ट सांगण्याचे काम करणारच आहे. शुक्रवारी बहुतेक आम्ही सर्व भेटणार आहोत. त्यावेळी हा विचार करू. बसून काही समज आणि गैरसमज नीट केले पाहिजे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यातील अंमलबजावणीत काही अडचणी आहेत असे फिल्डवरचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्या काय अडचणी आहेत. ते पाहणार आहोत. जरांगे यांनी १० जणांची टीम तयार केली पाहिजे. त्यांनी अभ्यासपूर्ण टीम केली तर ब-याच गोष्टी मार्गी लागतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »