भारताच्या दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले.
India’s Deepti Jeevanji clinched the gold medal at the world level. She went on to win gold at the World Para Athletics Championships 2024.
दीप्ती जीवनजीने टी-२० मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला. ४०० मीटरचे अंतर अवघ्या ५५.०७ सेकंदात गाठले. यासह भारताच्या दीप्तीने अमेरिकन अॅथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला.
यापूर्वी अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५५.१२ सेकंदांत ४०० मीटर अंतर गाठले होते. पण, भारताच्या दीप्तीने हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.१९ सेकंदात शर्यत पूर्ण केल्याने तिला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले.