khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Taiwan : खासदारांचा संसदेत हैदोस

A bill introduced in Taiwan’s parliament led to a stormy fight between lawmakers in the House. The bill proposes to give more powers to opposition MPs to monitor government affairs.

तैवानच्या संसदेत सादर केलेल्या एका विधेयकावरून सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. सरकारी कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांना जास्त अधिकार देण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे.

Clashes broke out before the vote on the bill between members of the Democratic Progressive Party (DPP) of newly elected President Ching Tei and members of the pro-China opposition Ki Kumetang Party (KMT), which Ching Tei won in an election a few days ago. He will soon take oath of office. It is said to be anti-China.

काही खासदार संसद अध्यक्षांच्या खुर्चीवरही चढले. एकमेकांना ओढून मारहाणही करीत होते. त्याचवेळी एक खासदार एका विधेयकाचा दस्तावेज घेऊन पळून जाताना व्हिडिओत दिसत आहे. सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासह संसदेत खोटी विधाने केल्यास सरकारी अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे या विधेयकात नमूद केले आहे.

विधेयकावरील मतदानापूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष चिंग ते यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीपीपी) आणि चीन समर्थक विरोधी पक्ष की कुमेतांग पार्टीच्या (केएमटी) सदस्यांमध्ये हाणामारी झाली चिंग ते यांचा काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये विजय झाला. ते लवकरच पदाची शपथ घेणार आहेत. ते चीन विरोधी असल्याचे बोलले जाते.

This happened when the bill was being debated in the parliament. MPs have abused and beaten each other. Over the past few days, there has been an uproar in Parliament over the bill. People also protested outside the Parliament.

या हाणामारीत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये डीपीपी आणि केएमटी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. संसदेत विधेयकावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून संसदेत खदखद निर्माण झाली. संसदेबाहेर देखील लोकांनी आंदोलन केले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »