khabarbat

Advertisement

Air India : पुणे-दिल्ली विमानाला भगदाड; मृत्यू मागे फिरला अन् १८० प्रवाशी बचावले

विमान अपघाताच्या दोन घटना समोर आल्या. सुदैवाने प्रवाशी बचावले आहेत.

विमान हवेतच पेटले; दिल्ली विमानतळावर आणीबाणी

दिल्ली विमानतळावर एका विमानाला आग लागल्यानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दिल्ली ते बेंगळुरुकडे निघालेल्या विमानाच्या एसी यूनिटमध्ये अचानक आग लागली. १७५ प्रवासी या विमानामध्ये होते. त्यानंतर विमानाला दिल्ली एअरपोर्टवर लँड करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार विमान आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

Plane collision at Pune airport.

Air India : पुणे-दिल्ली विमानाला भगदाड

पुणे येथील लोहगड विमानतळावरून दिल्लीला जाण्यास सज्ज असलेल्या  Air India च्या विमानाला ‘पुश बॅक टग’ (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठे भगदाड पडले. परिणामी विमान उड्डाण थांबवावे लागले. या विमानात १८० प्रवाशी होते. सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.

या धडकेत विमानाच्या खालील बाजूस असलेल्या ‘फ्युजलाज’ला मोठे भगदाड पडले, तसेच विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचे देखील नुकसान झाले. त्यामुळे Air India ला उड्डाण रद्द करावे लागले. या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणे विमानतळावरून एअर इंडिया फ्लाइट क्रमांक एआय ८५८ गुरुवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होते. ऐरोब्रिजला जोडलेले विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. या वेळी ‘पुश बॅक टग’ची मोठी धडक विमानाच्या खालील बाजूस बसली. यात विमानाचा पत्रा कापला गेला अन् भगदाड पडले. ही घटना विमानाच्या अपघात श्रेणीमध्ये येते.

विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्यापूर्वीच विमानाचा असा अपघात झाला. धडक झाल्यावर मोठा आवाज आला. वैमानिकांनी तत्काळ विमानाची पाहणी केली. विमानाला भगदाड पडल्याचे लक्षात येताच उड्डाण रद्द करण्यात आले.

An Air India flight bound for Delhi experienced a collision with a tug tractor while taxiing towards the runway at Pune Airport. The incident occurred when around 180 passengers were on-board. “The aircraft, carrying around 180 passengers, suffered damage to its nose and a tyre near the landing gear. Despite the collision, all passengers and crew on board are reported to be safe,” an airport official told ANI.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »