इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ स्पर्धा सध्या भारतात सुरू आहे. ही स्पर्धा सुरू असताना खेळाडूंनी इम्पॅक्ट (Impact Player) प्लेअर नियमावर सतत टीका केली. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे. लवकरच हा Impact Player चा नियम IPL मधून बाद होणार असल्याचे संकेत BCCI चे अध्यक्ष जय शहा यांनी दिले.
Impact Player च्या नियमामुळे १२ खेळाडूंना खेळवण्याची परवानगी संघांना मिळते. मात्र, यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात धावा होत आहेत. (Impact Player) इम्पॅक्ट प्लेअरमुळे गोलंदाजांचे मरण होत असल्याच्या आणि अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचा सूर क्रिकेटविश्वातून उमटला. उल्लेखनिय म्हणजे हा नियम आयपीएल २०२३ पासून लागू करण्यात आला आहे.
Impact Player ही एक चाचणी होती. दोन नव्या भारतीय खेळाडूंना यामुळे आयपीएलमध्ये संधी मिळत आहे, असे (BCCI) बीसीसीआयचे चेअरमन जय शहा यांनी सांगितले.
याविषयी माहिती देताना जय शहा म्हणाले, फ्रँचायझीबरोबर लवकरच बैठक होणार आहे. पुढीलवर्षी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन असल्याने किती खेळाडू संघात कायम केले जावेत, याबाबत चर्चा केली जाणार आहे.
हार्दिक पांड्या खेळणार देशांतर्गत क्रिकेट
अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारात ‘अ’ श्रेणीमध्ये स्थान मिळाले. याबाबत त्याने देशांतर्गत (Cricket) क्रिकेटमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळणार असल्याचे मान्य केले, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी दिली.