डॉ. नरेंद्र दाभोलकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या (दि. १० मे रोजी) देण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे.
डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिस, त्यानंतर एसटीएस आणि अखेर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) या सर्व संस्थांनी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास केला.
या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले.