एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (aiasl) मध्ये भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ५०० रूपये फीस भरावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन उमेदवाराला नाही.
पुणे येथे नोकरीची संधी….
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Pune%20Station.pdf या लिंकवर क्लिक करा, पुण्यातील recruitment (भरती) विषयी सविस्तर माहिती मिळेल.
याशिवाय जयपूर, चेन्नई येथेही recruitment केली जात आहे.
उमेदवारांची निवड ही मुलाखतीमधून केली जाईल.
जयपूर करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांना मध्यवर्ती एव्हिएशन अॅकॅडमी, १०२ विनायक प्लाझा, बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर येथे मुलाखतीसाठी उमेदवारांना पोहचावे लागेल. ८ ते ११ मे २०२४ दरम्यान या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. https://www.aiasl.in/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20%20Jaipur%20Station.pdf ही अधिसूचना उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीच्या तयारीला लागावे. नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी ही एक चांगली संधी म्हणावी लागेल.
खालील पदांसाठी भरती …
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमन, ग्राहक सेवा कार्यकारी अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकतात.