UPSC च्या निकालामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा दबदबा बघायला मिळतोय. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने टॉप केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा हा अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांना घवघवीत यश मिळाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींगनुसार अर्चित डोंगरेला 153 वी रँक मिळाली आहे. हेच नाही तर पहिल्या 100 जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे 81 व्या रँकवर आहे.
विशेष म्हणजे या निकालात 70 हून अधिक उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. आदित्य श्रीवास्तवने ही परीक्षा टाॅप केली असून दुसऱ्या क्रमांकावर अनिमेष प्रधान आहे. तिसऱ्या क्रमांकावर अनन्या रेड्डी आहे.
या परीक्षेचा निकाल उमेदवारांना upsc.gov.in या साईटवर बघता येईल. 2023 मध्ये यूपीएससीकडून 1143 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना 9 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते आणि आज याचा निकाल जाहिर करण्यात आला.