महाराष्ट्र राज्य वितरणमध्ये (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) 468 रिक्त पदांच्या जागी भरती करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक अकाऊंट्स (Junior Assistant Accounts) पदांवर भरती सुरु आहे.
MahaVitaran Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी
पद : कनिष्ठ सहाय्यक लेखा (Junior Assistant Accounts)
रिक्त पदांची संख्या : 468 पदे
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 19 एप्रिल 2024
यापूर्वी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 होती. मात्र, ही मुदत आता वाढवण्यात आली असून इच्छूक आणि पात्र उमेदवार 19 एप्रिल 2024 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकता.
MahaVitaran Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदांसाठी इच्छुक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता B.Com किंवा इंटर किंवा BBA किंवा संबंधित पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय MSCIT कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा :
महाराष्ट्र राज्य वितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी पात्र उमेदवाराचे वय 30 वर्षे आहे. उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय गटातील उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येईल.
अर्जाचे शुल्क :
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. मागासवर्गीय उमेदवाराला या शुल्कात सूट देण्यात आल्याने त्यांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
Latest Job Updates… Khabarbat.com
निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.