तुम्ही चपाती शौकीन असाल किंवा चपाती (diet chapati) खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसेल तर काळजी करू नका. इथे तुम्हाला एक fitness tip सांगणार आहे, ज्यामुळे चपाती खाऊनही तुमचं वजन (weight-loss) वाढणार नाही. महत्वाचे म्हणजे प्रोटीन भरपूर मिळाल्याने तुम्ही अधिक तंदुरुस्त (healthy) होवू शकता.

अशी करा चपाती…
चपातीसाठी कणिक मळत असताना त्यामध्ये जर तुम्ही पिठात थोडे बेसन (चणाडाळीचे पीठ) मिक्स केले तर तुमची चपाती अधिक पौष्टिक होणार आहे. बेसन हे हरभऱ्याच्या डाळीपासून बनते. हरभऱ्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन (protein) असतात. त्यामुळे गव्हाच्या पिठात जर तुम्ही बेसन मिसळले तर तुमचे वजन आणि शुगर दोन्ही कमी होण्यास नैसर्गिक मदत होणार आहे.
असे घ्या प्रमाण…
तुम्ही एक वाटी गव्हाचे पिठ घेत असाल तर त्यात अर्धी वाटी बेसन मिक्स करा. यामुळे पीठातील प्रोटीनचे प्रमाण वाढेल, दुसरी महत्वाची बाब म्हणजे नेहमीच्या तुलनेत कणीक (गव्हाचे पीठ) कमी प्रमाणात असल्यामुळे आपोआपच ग्लूटेनचे (gluten) प्रमाण कमी होईल. अशी चपाती खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतील.
आता हे लक्षात (diet tips) ठेवा…
कणिक मळत असताना बेसन आणि गव्हाचे पीठ योग्य प्रमाणात घ्या. यात तुमच्या आवश्यकतेनुसार चवीपुरते मीठ घाला. कणिक मळल्यानंतर लगेचच चपाती करायला घ्या. हे पीठ मळून जास्त वेळ ठेऊ नका. तसेच चपाती जाडसर (अगदीच पातळ नको) लाटून घ्या. ज्यामुळे ती गुबगुबीत होते अन् चवीलाही छान लागते.