बँक कर्मचाऱ्यांना १७% पगारवाढ देणाऱ्या करारावर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधीमध्ये अंतीम शिक्कामोर्तब झाले.
१२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १० खाजगी आणि३ विदेशी बँकातील ७ लाख बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ही पगारवाढ लागू असेल.
या पगारवाढीसाठी बँक व्यवस्थापनाला दरवर्षी १२,४४९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. याचवेळेस साडेसात लाख सेवानिवृत्तांना देखील दरमहा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ज्या पोटी बँकर्सना दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पेलावा लागणार आहे. ही वाढ २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
या पगारवाढीमुळे मुळ पगार, महागाई भत्ता, विशेष पगार, विशेष भत्ता, रजा, रजेचे रोखीकरण, घरभाडे भत्ता इत्यादी सेवाशर्तीत लक्षणीय सुधारणा घडून आली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीत विशेष सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा पगारवाढीचा करार ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू असेल.
याच करारात बँकर्सनी पाच दिवसांचा आठवडा या बँक कर्मचाऱ्यांच्या लोकप्रिय मागणीला तत्त्वतः मान्यता दिली असून प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रीया पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. बँकातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी, आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे प्रश्नावर चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
नोकरी विषयक Latest माहितीसाठी khabarbat.com
याबाबत देवीदास तुळजापूरकर (जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन) यांनी ही माहिती दिली.