सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकंदर ३ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांसाठी राबवली जात आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणा-या या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४ आहे. या भरती प्रक्रियेसाठी २० ते २८ वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेब साईटवर भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.