महावितरणमध्ये ४६८ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.
या भरती प्रक्रियेतून विद्युत सहायक, कनिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून राबवण्यात येणा-या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २० मार्च २०२४ आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून अर्ज करणा-या उमेदवाराचे वय हे ३० असावे. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागेल. या परीक्षेनंतर गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.
निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.