रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (RFCL) यांच्याकडून नोकर भरती राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया तेलंगणामधील ‘आरएफसीएल’च्या प्लांटसाठी आणि नोएडामधील कॉर्पोरेट कार्यालयासाठी सुरू करण्यात आली आहे. (RFCL) ‘आरएफसीएल’ने अभियंता, वरिष्ठ केमिस्ट, लेखा अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. २ मार्च २०२४ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४ आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी www.rfcl.co.in या साईटवर जावे लागेल. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. वैद्यकीय अधिकारी पद वगळता बाकी सर्व पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय हे ३० ते ३५ असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणा-या उमेदवाराला ७०० रूपये फीस भरावी लागेल.
बीई, बीटेक, बीएससी, एमएससी, एमबीए आणि एमबीबीएस पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून २७ पदे भरली जाणार आहेत.
निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.